महाराष्ट्रात मान्सूनने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर हीट वाढत आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका तीव्र जाणवत आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. 11 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने कोरडे, उष्ण आणि काही ठिकाणी दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. या विभागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा तापमानात जाणवणारी वाढ आणि दमट हवामानामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा- पुढील काही दिवस महत्त्वाचे! 21 राज्यांना पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती?
यावेळी कोकणात मुंबईसह कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये उष्णतेसोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असून या विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून उष्णतेसोबत दमट हवामानाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.