लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता ती चिंता दूर झाली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम म्हणजेच 1500 रूपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून जानेवारी 2026 चा हप्ता विचारात घेतल्यास 19 हप्ते खात्यात जमा झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळं महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. आता ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३… pic.twitter.com/mycGTG3Bk0 — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 24, 2026