महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Oct 2026 06:40 AM (IST)

    टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर, हरियाणातील सोनीपत कनेक्शन उघड

    टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत. यात समीर आणि जतीन यांना अटक केली आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील 10 आरोपींपैकी 7 आरोपी हरियाणातील सोनीपतचे असल्याची प्रथमिक माहिती आहे.

  • 22 Oct 2026 06:39 AM (IST)

    कोंढवा पोलिसांची धडक कारवाई, सराईत गुन्हेगाराकडून 12 मोबाईल आणि 3 दुचाकी जप्त

    कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून 12 मोबाईल आणि 3 दुचाकी जप्त केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यातील 24 वर्षीय आरोपी सोहेल इलाही दखणी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे कोंढव्यातील पॅराडाईज इन लॉजसमोरून आरोपीला ताब्यात घेतले.

  • 22 Oct 2026 06:37 AM (IST)

    पिरंगुटमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक

    महाविद्यालयीन परिसरात छेडछाड आणि रोडरोमिओंच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर बावधन पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यात शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवण्याची आणि पोलीस मार्शल तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थिनींची छेडछाड प्रकरणातील सहा आरोपींवर 24 तासांत कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा युवा सेनेकडून सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे, यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 22 Oct 2026 06:36 AM (IST)

    कचऱ्यात गेलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी स्वच्छ सेविकेने शोधून केली मालकाला परत

    रविराज सोसायटीतील नागरिकांची अंगठी चुकून ओल्या कचऱ्यात गेली होती. दुपारी 12 वाजता माहिती मिळताच पूजा ढावरे यांनी अर्धा तास कचऱ्यात शोध घेत अंगठी शोधली आणि आईच्या मदतीने अंगठी शोधून नागरिकांना सुपूर्द केली.

  • 22 Oct 2026 06:35 AM (IST)

    विषबाधेच्या रुग्णांनी ग्रामीण रूग्णालय फुल्ल; एक बेड वर दोन ते तीन रुग्णांचा उपचार...

    भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथील महाप्रसादातून झालेल विषबाधेमुळे ग्रामीण रुग्णालय पालांदूर हे फुल झाले असून उपचारासाठी एका बेड वर दोन ते तीन रुग्णांचा उपचार सुरू आहे. तर गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून या घटनेमुळे आरोग्यव्यवस्था युद्ध पातळीवर कामाला लागलेली आहे.या घटनेत 200 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असल्याचे पुढे आले आहे.

  • 22 Oct 2026 06:34 AM (IST)

    वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव.

    वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणूकीवर दगदफेक झाल्याने तणाव निर्माण झाले. मिरवणुकी दरम्यान उधळलेला गुलाल विशिष्ट समाजातील व्यक्तीच्या घरावर गेल्याने दुर्गा मंडळ आणि काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. जमावाने काही दुचाकी आणि अन्य वाहनांची तोडफोड केली. दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठा जमाव जमा झाला आहे.

  • 22 Oct 2026 06:25 AM (IST)

    टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर

    टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत.  यात समीर आणि जतीन यांना अटक केली असून समीरने मुख्य आरोपींचा अनिल पंडितशी संपर्क घडवून आणल्याचा आरोप आहे. तर जतिनने गोळीबारासाठी शस्त्रांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. आरोपींचे सोनीपत कनेक्शन उघड झाले असून टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात हरियाणातील सोनीपत येथील आरोपींची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number