रायगडमध्ये बांधकाम साइटवर मोठा अपघात! 25 कामगार अडकल्याची शक्यता; प्रशासनाची धावपळ

Khalapur Accident News: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे मोठी दुर्घटना घडलेली आहे. येथील एका कन्स्ट्रक्सन साइटवरील असलेला स्ट्रक्चर हा अचानक कोसळला आहे.

रायगडमध्ये बांधकाम साइटवर मोठा अपघात! 25 कामगार अडकल्याची शक्यता; प्रशासनाची धावपळ
Khalapur Accident

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे मोठी दुर्घटना घडलेली आहे. येथील एका कन्स्ट्रक्सन साइटवरील असलेला स्ट्रक्चर हा अचानक कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

संबंधित अपघातस्थळावरील ढिगारा हटवण्यासाठी क्रेन आणि हायड्रा मशीनची तातडीने गरज आहे. बचावकार्य सुरु करण्यात आले असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांनी तातडीने एमजीएम या हॉस्टिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अडकलेल्या कामगारांची नेमकी संख्या किती आणि या घटनटी अधिकृत माहिती अजूनही प्रशासनाने दिली नाही. घटनास्थळी अजून बचाव पथक काम करत आहेत.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number