मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना म्हणजे राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही घटना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी घडली असून, या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्याचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडून आठवणींना उजाळा
या अत्यंत कठीण प्रसंगात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील बहीण भावाचे नाते संपूर्ण राज्याने पाहिले आहे. या दुःखद घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अजितदादांसोबतचा एक खास सेल्फी फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा: Mumbai Airport Incident: दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले... सुदैवाने मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
'थँक्यू सुजित'...
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्या अजित दादांसोबत हसताना दिसत आहेत. या फोटोला त्यांनी “Thank You Sujit” असे छोटेखानी आणि आभार व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे. हा फोटो शेअर करण्यामागे त्यांची अजित पवार यांच्याविषयी असलेली कृतज्ञता, प्रेम आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येत आहे. या कॅप्शन मधील सुजीत नावाची व्यक्ति कोण आहे हे अद्याप समजलेले नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा स्टेटसच्या माध्यमातून भावाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले होते, मात्र आजचा हे स्टेटस पाहून कार्यकर्त्यांच्या आणि सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांचे हे स्टेटस सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून, राज्यभरातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित पवार यांच्या या दुर्दैवी विमान आपघातताचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: धुळे गारठले, मुंबई तापली, राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ; पाऊसही पडण्याची शक्यता