पुण्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भोर तालुक्यात शेतात काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. ज्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला त्या दिवशी तिचा वाढदिवस होता अशी माहितीदेखील समोर आली आहे. शुभांगी निलेश राऊत असं मृत महिलेचे नाव असून त्या 41 वर्षाच्या होत्या.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, शुभांगी निलेश राऊत या शनिवारी सकाळी आपल्या शेतात मसूर आणि वाटाणा मळणीचे काम करत होत्या. त्याचवेळी ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्राच्या (थ्रेशर) साहाय्याने धान्य भरडण्याचे काम जोरात सुरू होते. या ठिकाणी काम करत असताना शुभांगी काही कारणास्तव मशीनजवळ वाकल्या. त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस सुरू असलेल्या मशीनमध्ये ओढले गेले. मशीनचा वेग अधिक असल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा - महाराष्ट्रातील 'या' शहरात उभे राहणार नवीन आयटी पार्क, स्थानिक तरुणांना शहरातच मिळणार रोजगार
अपघात घडल्याचे लक्षात येताच त्यांचे नातेवाईक जयेंद्र सुरेश राऊत, संतोष शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ कांटे यांनी धाव घेत मशीनमधून त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हेही वाचा - Hardik Pandya: विभक्त होऊनही जबाबदारीत कसर नाही; हार्दिकने नताशा आणि मुलाला दिली आलिशान कार भेट, किंमत ऐकून व्हाल थक्क
त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन वाढदिवसादिवशीच त्यांचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेची अकस्माक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.