आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 6 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या काय?
1. कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला करावेत,
2. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 60 टक्के महागाई भत्ता लागू करावा,
3. महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी द्यावी
4. 2024-28 चा वेतन करार सातव्या वेतन आयोगानुसार करावा
हेही वाचा – मोठी बातमी! विधवा पेन्शनसह 5 सरकारी योजनांची नावं बदलली; मोदी सरकारचा मोठा निर्णय
याशिवाय, दिवाळी बोनस म्हणून 15 हजार रुपये द्यावेत, कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी अदा करावीत आणि कोरोना काळातील प्रलंबित भत्ता द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. 2019 मधील पात्र उमेदवारांना नोकरीत संधी द्यावी, इलेक्ट्रिक बसेसबाबत पुनर्विचार करावा आणि महिलांच्या सवलतीच्या प्रवासासाठी ईटीआयएम मशीनमध्ये रोख रकमेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचाही त्यात समावेश आहे.
या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास राज्यभरातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर सरकार काय तोडगा काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर