उन्ह्याच्या तडाख्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वाचा आजचा हवामान रिपोर्ट

राज्यात ऑक्टोबर हिटचे चटके बसताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

उन्ह्याच्या तडाख्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वाचा आजचा हवामान रिपोर्ट

राज्यात ऑक्टोबर हिटचे चटके बसताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पुढील 2 दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात पुढील 2 दिवस उष्णता कायम राहणार असून 17 ऑक्टोबरपासून काही भागात पावसाची शक्यता वर्तवली जातेय. हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसेल. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – सायन उड्डाणपूल तयार, पण सुरू होईना, उद्घाटनाबाबत मोठी अपडेट समोर

मुंबई किनारपट्टीसह कोणत्या भागांत उष्णतेचा चटका?
राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबई, रत्नागिरी आणि अलिबागसह संपूर्ण किनारपट्टी भागात दमट हवामानामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा चटका कायम राहून दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

पावसाचा यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?
कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number