कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरजवळील दानोळीत रक्तरंजित थरार; अज्ञातांच्या गोळीबारात महेश दळवींचा जागीच मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरारक प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले.
mahesh dalvi
mahesh dalvi

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरारक प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. महेश दळवी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, जयसिंगपूरजवळ असलेल्या दानोळी गावात ही गोळीबाराची घटना घडली. साधारण 11 वाजण्याच्या सुमारास महेश दळवी यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; महामार्गावरील अपघातात ट्रकच्या धडकेत चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version