घरी परतण्याची वाट पाहत होते…,पण येवला महामार्गावर घडलं भयंकर, दोन जणांचा दुर्दैवी अंत

Chhatrapati Sambhajinagar News : वैजापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अंदरसुल शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांबाबत ही दुर्घटना घडली असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत.
Accident News
Accident News

वैजापूर-छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झालेला आहे. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात अंदरसुल शिवारात घडला.

महामार्गावर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन तिघेजण प्रवास करत असल्याची माहिती आहे. प्रवास करत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – निर्दयी प्रकार! आजीला फरफटत नेत पैसे हिसकावण्याचा प्रयत्न; CCTV मध्ये घटना कैद, व्हिडिओ व्हायरल

दुचाकीला धडक देऊन वाहन पसार
गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. मृ आणि जखमी हे तिघेही वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे. अपघानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून वैजापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version