Monday, May 11, 2026 11:03:05 AM

Maharashtra IAS Transferred: मुंबई ते गडचिरोली प्रशासनात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी पाच वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

maharashtra ias transferred मुंबई ते गडचिरोली प्रशासनात मोठा फेरबदल महाराष्ट्रातील 5 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra IAS Transferred: राज्य प्रशासनातील कामकाजाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी पाच वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यांतील ही तिसरी मोठी बदली प्रक्रिया असून, कॅबिनेट बैठकीच्या आसपास बदल्यांचे सत्र या वेळीही कायम राहिल्याचे दिसून येत आहे.

बदली झालेल्या पाच अधिकाऱ्यांची यादी आणि नवी नियुक्ती:
1. डॉ. बी. एन. पाटील: पर्यटन संचालक (मुंबई) पदावरून आता त्यांची नियुक्ती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 'रुसा' (RUSA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे.
2. मंगेश जोशी: 'यशदा' (पुणे) चे उपमहासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या जोशी यांची बदली आता पर्यटन संचालक (मुंबई) म्हणून करण्यात आली आहे.
3. कुलदीप जंगम: सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहणाऱ्या जंगम यांची नियुक्ती आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाली आहे.
4. कुशल जैन: गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि अहेरीचे प्रकल्प अधिकारी असलेल्या जैन यांच्याकडे आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
5. रेवैया डोंगरे: धाराशिवमधील भूम उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी डोंगरे यांची बदली यवतमाळमधील पांढरकवडा (ITDP) प्रकल्प अधिकारी आणि केळापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

हेही वाचा - Mango Farmers : आधी पाऊस अन् आता उन्हाने आंबा खाल्ला! कोकणचा राजा हापूस यंदा निसर्गाच्या दुहेरी संकटात

गेल्या आठवड्यातील मोठ्या नियुक्त्यांवर एक नजर 
मागील आठवड्यातही प्रशासनाने 13 अधिकाऱ्यांची खांदेपालट केली होती. त्यात प्रामुख्याने कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी, तर डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती. याशिवाय सांगली, अमरावती, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्येही नवीन सनदी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री