Mumbai Metro 3 Phase: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबईतील मेट्रो लाईन-3 (अॅक्वा लाईन) च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंतच्या 10.99 किमी लांबीच्या फेज 2B टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर गुरुवारी संपूर्ण 33.5 किमीचा भूमिगत कॉरिडॉर कार्यान्वित झाला. दरम्यान, मोदींनी नव्याने उभारलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही भेट दिला आणि विविध प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण केले.
मेट्रो लाईन-3 ची वैशिष्ट्ये
कॉरिडॉरमध्ये 27 स्थानके असून, कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, बीकेसी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, आरे डेपो इत्यादी महत्त्वाचे केंद्रे जोडलेली आहेत. मेट्रो लाईन-3 ही मुंबईची पहिली अशी मेट्रो, ज्यामुळे प्रमुख निवासी, व्यावसायिक व वारसा क्षेत्रांशी सुलभ संपर्क मिळेल. यासाठी अंतिम टप्प्याचा खर्च 12,195 कोटी, तर संपूर्ण लाईन 37,270 कोटी असणार आहे. या लाईनमुळे रेल्वे आणि विमानतळ कनेक्टिव्हिटी मिळणार असून सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी इंटरमॉडल प्रवास सुलभ होणार आहे.
हेही वाचा - Porsche vs BMW Race : ताशी 150 चा स्पीड, पोर्शेची बीएमडब्ल्यूसोबत रेस; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
प्रवासी भाडे
या लाईनवर 3 किमी साठी 10 रुपये, 3–12 किमी – 20 रुपये, 12–18 किमी – 30 रुपये, 18–24 किमीसाठी 40, 24–30 किमी – 50 रुपये, 30–36 किमी – 60 रुपये भाडे असणार आहे.
हेही वाचा - Health Checkup: आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वपूर्ण निर्णय, ही महापालिका दातांचे मोफत उपचार करणार
डिजिटल मोबिलिटी – मुंबई वन अॅप
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मुंबई वन अॅप सादर केले, जे 11 वाहतूक ऑपरेटरसाठी डिजिटल तिकीटिंग, मल्टीमॉडल ट्रिप प्लॅनिंग आणि कॅशलेस पेमेंट सुविधा देते. यात मेट्रो लाईन्स 1, 2A, 7, अॅक्वा लाईन 3, मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, उपनगरीय रेल्वे आणि BEST सेवा समाविष्ट आहेत. मुंबई मेट्रो लाईन-3 चे हे उद्घाटन शहरातील शहरी वाहतूक आणि प्रवासाचा अनुभव बदलणार आहे.