अखिल भारतीय काँग्रेस समितीने महाराष्ट्र काँग्रेसपाठोपाठ मंगळवारी रात्री मुंबई काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता ही घोषणा महत्त्वाची मानली जाते. यावेळी राजकीय घडामोडी समितीसोबतच मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांची घोषणा करण्यात आली.
राजकीय घडामोडी समितीचे अध्यक्षपद मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.मुंबई काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाचे माजी मंत्री आणि मुंबईतील अल्पसंख्यक समाजाचे नेते अस्लम शेख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वरिष्ठ उपाध्यक्षपदी आमदार अमीन पटेल, अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - दिवाळीची खास भेट ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
दक्षिण मुंबईची जबाबदारी रवी बावकर, दक्षिण मध्य मुंबई कचरू यादव, उत्तर मध्य अर्शद आझमी, उत्तर मुंबई राजपाल यादव, उत्तर पूर्वसाठी केतन शाह, उत्तर पश्चिमसाठी भावना जैन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा - Mumbai OneTicket: पंतप्रधान मोदींनी लाँच केले ‘मुंबई वनटिकट’ अॅप! आता मुंबईत बस, ट्रेन आणि मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार
त्याशिवाय इतर पाच प्रवक्त्यांची घोषणा यावेळी करण्यात आली. यामध्ये माजी नगरसेवक शीतल म्हात्रे, आनंद शुक्ला, शकील चौधरी, सुरेशचंद्र राजहंस आणि सय्यद हुसैन यांचा समावेश आहे.