मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच! शिवसेना पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत; अपघात कसा घडला? पाहा CCTV

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्यांची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग अपघात
Mumbai Goa Highway Accident

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा आज झालेल्या भीषण अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गाच्या मुंबई लेनवर माणगावजवळ घडलेला आहे.

अपघात नेमका घडला कसा? 
मिळालेल्या माहितीनुसार, एक कार आणि दुचाकी ही वाहन एकाच दिशेने जात होतं. पुढे असलेला दुचाकीस्वार अचानक उजव्या बाजूला वळला आणि मागून येत असलेल्या कारने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनेच दृश्य जवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

हेही वाचा – माणुसकीला काळिमा! 63 वर्षीय आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी अन् लोखंडी खुरप्याने वार; येवतीत खळबळ

या मृताची ओळख ही पटली असून ते जनार्दन गोवारी, राहणार दीघी,तालुका श्रीवर्धन असे असून ते शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काही महिन्यांत 4 ते 5 गंभीर अपघात
स्थानिक नागरिकांच्या मते, मामगाव शहराला जोडणाऱ्या मुगवली या ठिकाणावरील पुलाच्या उतारानंतर काही अंतरावर असलेल्या आडघक फाट्यावर डायव्हर्ज आहे. या धोकादायक डायव्हर्जनमुळेच येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहे. गेल्या काही महिन्यात या ठिकाणी तब्बल चार ते पाच गंभीर अपघात झाले आहेत..दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version