दररोज घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोने तुम्हीही प्रवास करता?मग तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या पहिल्या मेट्रो मार्गावर आता हजारो प्रवाशांना गर्दीतून सुटका मिळणार आहे.
गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावर हजारो प्रवाशांना 4 डब्यांच्या मेट्रोमध्ये प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता. सकाळ असो वा संध्याकाळ या मार्गावरील मेट्रोमध्ये पाय ठेवायलाही जागा नसायची. प्रवाशांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेता मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावर आता 4 डब्यांऐवजी थेट 6 डब्यांची मेट्रो धावणार आहे.
हेही वाचा-कल्याणमध्ये थरकाप उडवणारी घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे गंभीर जखमी; धक्कादायक सत्य समोर
संबंधित कंपनीने यासाठी 22 नवे डबे खरेदी करण्याची प्रक्रिया ही सुरु केली आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता थेट 50 टक्क्यांनी वाढणार आहे. घाटकोपर-वर्सोवा हा तब्बल 11.4 किलोमीटरचा असलेला मार्ग मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार लाईफलाईन मानला जातो. या मार्गावर दरदिवशी साडेचार लाखांहून अधिक मुंबईकर प्रवास करतात.
सहा डब्यांची मेट्रो लवकरच धावणार?
घाटकोपर,अंधेरी आणि वर्सोवा स्थानकांवर पाहिलं तर गर्दीचा तुफान असते. नव्या निर्णयानुसार, आता प्रत्येक फेरीत साधारण 1792 इतके प्रवासी एकाच वेळी प्रवास करु शकतील. चार डब्यांमुळे जी धक्काबुक्की तसेच रांगेत उभे राहण्याची जी समस्या होती, ती आता बऱ्या प्रमाणात कमी होईल.
हेही वाचा-घटस्थापनेच्यावेळी कलशात 1 रुपयाचं नाणं का ठेवतात? जाणून घ्या धार्मिक कारण
सध्या सहा डब्यांच्या मेट्रोच्या तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा तपासणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. सर्व ठरलेले निकष पूर्ण होताच ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होईल आणि लवकरच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल.