Muralidhar Mohol Controversy: पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळा प्रकरणात सतत आरोपांना सामोरे जात असलेल्या खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्यांदाच जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींची भेट घेतली. यावेळी जैन समाजाचे प्रतिनिधी आणि समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. मोहोळ यांनी मीडिया समोर स्पष्ट केले, 'या प्रकरणात माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा सहभाग नाही. प्रत्येक समाजाचे गुरू वंदनीय असतात. त्यांच्या दर्शनासाठी मी येथे आलो आहे. जर मी दोषी असतो तर इथे आलो नसतो. या सर्व विषयावर राजकारण झाले आहे. व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या. परंतु, मी आपल्याला आश्वासन देतो की, या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल आपल्या हवा तसा हा विषय संपेल.'
मुरलीधर मोहोळ यांनी पुढे म्हटलं की, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की हा विषय योग्यरित्या पूर्ण व्हावा. व्यक्तीगत राजकारणातून काही तणाव निर्माण झाला आहे, मात्र, मी जैन बांधवांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.
हेही वाचा - Eknath Shinde in Delhi: मध्यरात्रीच उपमुख्यमंत्री शिंदेंनी गाठली दिल्ली; महायुतीत होणार नवी समीकरणे?, राज्यातील राजकारणात खळबळ
मोहोळ यांच्याविरोधात घोषणाबाजी
तथापी, या प्रकरणी जैन मुनींनी सांगितले, जोपर्यंत या विषयाचे नीट निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाही. तथापी, मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर उपस्थित जैन समाजातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोर्डिंग डील रद्द करा’ अशा घोषणांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि अखेरीस मुरलीधर मोहोळांना तेथून निघावे लागले.
हेही वाचा - Pune Metro : पुणे मेट्रोचा विस्तार प्रकल्प वेगाने मार्गावर; वाघोली आणि चांदणी चौकपर्यंत मेट्रो धावणार
दरम्यान, यावेळी जैन समाजाच्या प्रतिनिधींनी आरोप केला की, जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार देखील मुरलीधर मोहोळ यांनीच केला असून तो बेकायदेशीर आहे. मात्र, मोहोळ यांनी या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तथापी, जैन समाजाने आक्रमक घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तथापी, आता जैन समाज पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.