Wednesday, June 25, 2025 02:00:43 AM

'मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो, तो जनतेचा...'; नितेश राणेंच्या वक्तव्यावर वडिलांचा संताप

‘मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो’ या वादग्रस्त विधानावर नारायण राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेला सार्वजनिक मंचावर समज दिली. राजकारणात मर्यादा आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित.

मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो तो जनतेचा नितेश राणेंच्या वक्तव्यावर वडिलांचा संताप

धाराशिव: मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो, असे विधान करून वादात सापडलेल्या नितेश राणेंना त्यांच्या वडिलांनीच समज दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टपणे भाष्य केले आणि आपल्या पुत्राला सार्वजनिक मंचावर कान टोचले.

नारायण राणेंनी स्पष्ट सांगितले की, 'मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो' हे वक्तव्य चुकीचे आहे. मुख्यमंत्री हा कुणाचाही बाप नसतो हे खरं, पण तो जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना देखील लोकांनी मला 'साहेब' म्हणू नये, 'सेवक' म्हणा, असे सांगायचो.' अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Drug Racket Busted: पालघरमध्ये बेकायदेशीर एमडी ड्रग्ज उत्पादनाचा पर्दाफाश, तिघांना अटक

धाराशिव दौऱ्यावर असताना झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले, 'राजकारणात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण त्या बोलण्यामध्ये शिष्टाचार आणि मर्यादा असाव्यात. कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका न करता त्यांच्या धोरणांवर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री हे एक पद आहे, व्यक्ती नाही. त्या पदाचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे.'

दरम्यान, नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात 'मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो' असे विधान करत विरोधकांवर टीका केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या वक्तव्याचा निषेध करत नितेश यांच्यावर टीका केली. आता स्वतः नारायण राणेंनी या प्रकरणात लक्ष घालून स्पष्ट केले की ते विधान योग्य नव्हते आणि त्यांनी त्याबाबत नितेशला समज दिली आहे.

हेही वाचा:शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद; 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा

याच पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी निधी अडवण्याच्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'कोणाचाही निधी अडवणे चुकीचे आहे. कोणत्याही भागाचा विकास थांबू नये यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. निधीच्या अडथळ्याबाबत मी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे.'

राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे. अनेकजण नारायण राणेंच्या भूमिकेचे कौतुक करत आहेत तर काहींना वाटते की, ही प्रतिक्रिया वेळेवर आली असती तर वाद एवढा वाढला नसता. मात्र एकूणच या प्रकारामुळे राजकीय वक्तव्यांमध्ये जबाबदारी आणि संयम किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


सम्बन्धित सामग्री