आधी आजारपणाचं कारण, मग ग्लुकोज पावडरच्या बहाण्याने घरी नेलं; तरुणीसोबत नराधमांनी क्रुरतेचा कळसच गाठला

Nashik Crime News : नाशिकमधील पंचवटी परिसर पू्र्णपणे हादरुन गेला आहे. पवार चाळ परिसरात 19 वर्षीय आदिवासी तरुणीवर सामूहिक अत्याचाक झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.

आधी आजारपणाचं कारण, मग ग्लुकोज पावडरच्या बहाण्याने घरी नेलं; तरुणीसोबत नराधमांनी क्रुरतेचा कळसच गाठला
Nashik Crime News

नाशिकमधील पंचवटी परिसर पू्र्णपणे हादरुन गेला आहे. पवार चाळ परिसरात 19 वर्षीय आदिवासी तरुणीवर सामूहिक अत्याचाक झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.

आजारी असल्याचा गैरफायदा घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची मध्य प्रदेशातील सतना या जिल्ह्यातील आहे. सध्या ती मखमलाबाद परिसरात मजुरीचे काम करते. 10 ऑक्टोबर रोजीच्या रात्री तरुणीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला विक्रम शाहने पंचवटीमधील एका क्लिनिकमध्ये नेले. त्यानंतर ग्लुकोज पावडर देतो असे मदतीचे वचन देत तिला आपल्या घरी आणले.

हेही वाचा-पुणे हादरले! मस्ती करतो म्हणून 3 वर्षाच्या चिमुकल्याला घेतलं अन् बाथरुममध्ये….; CCTV पाहून पालक थरथरले

घरी नेत विक्रम शाह आणि त्याचा साथीदार अशोक शाह या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे, हा प्रकार कुणाला ही सांगितल्यास जीवे मारण्याचीही धमकीही आरोपींनी तरुणीला दिल्याचे, तक्रारीत सांगितले आहे.

परिसरात खळबळ
धक्क्यातून सावरल्यावर पीडित तरुणीने थेट म्हसरुल पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाी करत 11 ऑक्टोबरला विक्रम शाह आणि अशोक शाह या दोघांना अटक केली आहे. म्हसरूळ पोलिसांकडून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number