ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील टोळीचा भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून 32 मोबाइल फोन,49 एटीएम कार्ड,40 सिमकार्ड, 4 लॅपटॉप आणि मोबाइल चार्जर यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात असल्याची माहिती भिवंडी पोलिस उपायुक्त डॉ.पवन बनसोड यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
नेमकं काय सुरू होतं?
17 ऑक्टोबर रोजी भगवान दास या व्यक्तीने वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून भिवंडीतील फिर्यादीसह त्याचे सात मित्र यांच्याकडील बँक पासबुक,एटीएम, सिमकार्ड, चेकबुक याचा सर्व तपशील स्वतःकडे घेतला. त्यानंतर तो त्या माध्यमातून ताकरदारांचा विश्वासघात करून त्यांच्या बँक खात्यांचा उपयोग khiladi000003 @gmail. com,https:www.anna555.online आणि https: www.khiladi.biz./ home या गेमिंग साईड करीता वापरून खाते धारकांच्या खात्याचा वापर करून पैशांची डेक्कन घेवाण करून खातेदारांची फसवणूक केली होती.
याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते आणि पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत डांगे,पोउनि रामदास कोलते यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलिसांनी संशयितांच्या तांत्रिक तपासातून माग काढीत रॉयल पाम आयलँड 08 आरे गोरेगाव मुंबई या इमारतीत छापा मारून तेथून अनिकेत यादव (24) ,रमेश मंडळ, (26 दोघे रा. छत्तीसगड),खिलेश यादव (24 रा.झारखंड),कुंदन यादव (21 रा.बिहार), राजाराम राऊत (26, रा. झारखंड),अतिश यादव (20,रा.बिहार) ,अशोक यादव (28 ,रा.बिहार) , दिलीप यादव (28,रा.बिहार), जितेंद्र कुमार यादव (22,रा.बिहार) संटू यादव (28 रा.बिहार) अशा विविध राज्यातील दहा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
10 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 26 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत असून आरोपींनी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून बँक खात्यांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण कोठे केली आहे आणि या गुन्ह्यात आंतरराज्य टोळी कार्यरत आहे का ? याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती शेवटी डॉ.पवन बनसोड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.