Thursday, May 22, 2025 09:29:03 PM

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. दरम्यान दहशतवादी भ्याड हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

pahalgam terror attack दहशतवादी हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध

मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या सहा जणांचे पार्थिव पहलगाममधून महाराष्ट्रात आणले आणि त्यांच्यावर अत्यसंस्कारही करण्यात आले. दरम्यान दहशतवादी भ्याड हल्ल्याचा राज्यातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.  

चिपळूणमध्ये राष्ट्रवादीकडून निषेध 
चिपळूणमध्ये राष्ट्रवादीकडून दहशतवादी हल्ल्यातचा निषेध करण्यात आला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये राष्ट्रवादीने पोलिसांना निवेदन दिले. दहशतवादींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज चिंचनाका येथून पोलीस ठाण्यापर्यंत राष्ट्रवादीने मोर्चा  काढला. मोर्चानंतर पोलिसांना निवेदनाद्वारे दहशतवादीवर कडक कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

धुळ्यात दहशतवादी हल्ल्याचा समाजवादी पक्षाच्यावतीने निषेध 
काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा धुळ्यात समाजवादी पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तात्काळ भारत सरकारने दहशतवाद्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा : हिंदवी पाटीलकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक 
मालेगाव येथील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत मालेगाव येथील सरदार चौकातून मोर्चा काढत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आयएसआय जिहादी यांचा पुतळ्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी मालेगावकरांनी देखील आपले दुकानात बंद ठेवत जम्मू काश्मीरमधील घटनेचा निषेध केला. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात मुंबईत राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात आली. हाताला काळ्या फिती लावत निदर्शने केली. महात्मा गांधी पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. 

दहशतवादी भ्याड हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध 
काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ शिवसेनेने आज कल्याण पूर्वेमध्ये काटे मानवली पुलाजवळ निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. यावेळी माजी नगरसेविका माधुरी काळे आणि शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते. 

अमरावतीत दहशतवादी हल्ल्याचा वकील संघाकडून निषेध
जम्मू कश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या बेछुट गोळीबाराचा अमरावती जिल्हा वकील संघाने तीव्र निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वकील संघाने मूकमोर्चा काढला. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना वकील संघाने श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी वकील संघाने केली. या हल्ल्याचा सर्व वकिलांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.


 


सम्बन्धित सामग्री