Konkan Railway Time Table: प्रवासाला निघण्यापूर्वी हे नक्की वाचा; कोकणकन्या, मांडवीसह ‘या’ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल, कारण काय?

मांडवी, कोकणकन्या, तुतारी आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

Konkan Railway Time Table: प्रवासाला निघण्यापूर्वी हे नक्की वाचा; कोकणकन्या, मांडवीसह ‘या’ रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल, कारण काय?

पनवेल: कोकणात जाणाऱ्या आणि तिथून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने पनवेल ते कळंबोली दरम्यान महिनाभराचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला असून, याचा थेट फटका कोकण रेल्वेच्या मुख्य गाड्यांना बसणार आहे. विशेषतः कोकणची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, तुतारी आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना आता अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

प्रकल्पाचा उद्देश आणि कालावधी

हा ब्लॉक ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ म्हणजेच समर्पित मालवाहतूक मार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. पनवेल ते कळंबोली स्थानकांदरम्यान ‘ओपन वेब गर्डर’ उभारणीचे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. हा रात्रकालीन ब्लॉक 18 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे. सुदैवाने, हे काम रात्रीच्या वेळी होणार असल्याने नियमित धावणाऱ्या लोकल सेवांवर त्याचा मोठा परिणाम होणार नाही; मात्र 16 मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेगाला यामुळे लगाम लागणार आहे.

हेही वाचा: Coastal Road: आता प्रवास सुस्साट; अटल सेतूच्या 'महाकनेक्ट'ला CRZ चा हिरवा कंदील, असा बदलणार नवी मुंबईचा चेहरा

मांडवी एक्सप्रेसच्या वेळेत बदल

या ब्लॉकमुळे सर्वाधिक परिणाम मांडवी एक्सप्रेसवर होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी  सुटणारी मांडवी एक्सप्रेस या ब्लॉकमुळे आता सकाळी आठ वाजून 20 मिनिटांनी  सुटेल. परिणामी, मडगावला पोहोचण्यासाठी देखील या गाडीला नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीर होणार आहे. तसेच कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या कोकणकन्या, तुतारी आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस ठिकठिकाणी थांबवण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे.

असे असेल ब्लॉकचे नियोजन

रेल्वेने या महिनाभराच्या कालावधीत एकूण सहा महत्त्वाचे दिवस ब्लॉकसाठी निश्चित केले आहेत. यामध्ये 18 जानेवारी, 25 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी या तारखांचा समावेश आहे. 18 जानेवारी रोजी होणाऱ्या कामामुळे दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस पनवेलऐवजी कर्जत – कल्याण – वसई या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच मंगळुरू – CSMT एक्सप्रेसही काही काळ थांबवून पुढे सोडली जाणार आहे.

प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन

प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा चौकशी खिडकीवरून अद्ययावत वेळापत्रक तपासूनच घरून निघावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तांत्रिक विकासकामांमुळे होणारी ही तात्पुरती गैरसोय असली, तरी प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे.

हेही वाचा: Maharashtra – Karnataka Case: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी आज सुनावणी; केंद्र आणि कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयात द्यावे लागणार उत्तर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number