नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी वाहनांच्या प्रवेश बंदीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आलेला आहे.
वाहतुकीचे नवे नियम आधी जाणून घ्या
नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर उद्यापासून अर्थात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 26 ऑक्टोबर सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. ज्यामध्ये भाडोत्री वाहने, ऑटोरिक्षा, खाजगी चारचाकी तसेच दुचाकींचा ही समावेश करण्यात आलेला आहे. फक्त एसटी महामंडळाच्या बसेसना या मार्गावर परवानगी असणार आहे. या संबंधितीचे आदेश अपर जिल्हांदडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी जारी केलेले आहेत.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक हे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येत असतात. उद्यापासून या गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसेच गडाचा घाट रस्ता हा अरुंद तसेच वळणाचा असल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. भाविकांची सुरक्षेसह कायदा सुव्यवस्था योग्य राहावी त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
याआधी ही बंदी 25 ते 26 ऑक्टोबर रात्रीपर्यंत ठेवण्यात आलेली होती. मात्र ती आता दोन दिवस आधीपासून लागू केली आहे. गरजेनुसार हा निर्बंध शिथिल ही करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवलेला आहे. लागू केलेले नियम मोडणाऱ्यावर कारवाी केली जाणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.