जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या गोरेगाव परिसरात पोलीस अधिकाऱ्याची माफियागिरी पाहायला मिळालीय. शाहीद खान नावाच्या तरुणाला पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केलीय. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. पैशांच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरु करण्यात आलीय. शाहीद खान यांच्या घरात सात फेब्रुवारीला हे पोलीस अधिकारी घरात घुसले आणि थेट शाहिद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शाहीद खान यांच्या आईनं 2016मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोतलिंग यांच्याकडून साडेतीन लाखांचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज व्याजासह फेडूनही विजय मोतलिंग त्रास देत होते. शेवटी शाहिद यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामुळे या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला.