पुणेकरांसाठी रेल्वेचा मोठा दिलासा! आझाद हिंद एक्स्प्रेसला पर्यायी ‘स्क्रॅच रेल्वे’ सुरू; अतिरिक्त डब्यांचीही सोय

पुणे-हावडा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातून सुटणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसला होणारा 8 ते 10 तासांचा विलंब आता टळणार आहे.

पुणेकरांसाठी रेल्वेचा मोठा दिलासा! आझाद हिंद एक्स्प्रेसला पर्यायी ‘स्क्रॅच रेल्वे’ सुरू; अतिरिक्त डब्यांचीही सोय

पुणे-हावडा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यातून सुटणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसला होणारा 8 ते 10 तासांचा विलंब आता टळणार आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने 22 आयसीएफ डब्यांची पर्यायी ‘स्क्रॅच रेक’ तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या महत्त्वाच्या आणि नेहमी गर्दी असलेल्या गाड्यांपैकी आझाद हिंद एक्स्प्रेस एक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हावड्याहून पुण्यात येणारी गाडी सतत उशिराने पोहोचत होती. त्यामुळे तिची साफसफाई आणि देखभाल करून पुन्हा हावड्याला पाठवण्यासाठी 8  ते 10 तास उशीर होत होता. प्रवाशांना स्थानकावर तासनतास वाट पाहावी लागत होती.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

आता या निर्णयानुसार, हावड्याहून येणारी मूळ गाडी उशिरा आली तरीही पुण्यातून सुटणारी गाडी पर्यायी रेकमुळे वेळेवर सुटेल आणि प्रवाशांची गैरसोय टळेल.

स्क्रॅच रेक म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीला परतीच्या प्रवासात मोठा विलंब होतो, तेव्हा रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त डब्यांपासून तयार केलेल्या पर्यायी गाडीला 'स्क्रॅच रेक' किंवा 'स्क्रॅच रेल्वे' असे म्हणतात. मूळ गाडी उशिरा आली तरी प्रवाशांना वेळेवर रवाना करण्यासाठी याचा वापर केला जातो.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number