शिर्डी : साईबाबा संस्थानाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तिरूपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नविन डोनेशन धोरण लागू करण्यात आले आहे. दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान देणाऱ्या भाविकांना व्हिआयपी दर्शनासह विविध लाभ मिळणार आहेत.
देशविदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक भरभरून दान देत असतात अशा दानशूर भक्तांना आता थेट व्हिआयपी दर्शन आणि आरतीला उपस्थित राहता येणार आहे. दहा हजारपेक्षा जास्त रूपयांचे दान देणाऱ्या भाविकाच्या परिवारातील पाच जणांना व्हिआयपी दर्शन आणि आरतीला उपस्थित राहाता येणार आहे. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
हेही वाचा : Maharashtra Board SSC Result 2025: कोणताही क्लास न लावता दहावीत मिळाले 100 टक्के गुण
कसे आहे नवीन देणगी धोरण?
दहा ते पन्नास हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा मिळणार लाभ मिळणार आहे. देणगी देणाऱ्या भक्ताच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी सुविधा देण्यात येणार आहे. 40 हजार ते एक लाख देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. 1 लाख ते 10 लाख देणगी देणाऱ्या भक्तांसाठी दोन व्हिव्हीआयपी आरत्यांचा लाभ तसेच वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. 10 लाख ते 15 लाख वर्षातून दोन व्हिव्हिआयपी आरती तसेच वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफटाईम व्हिआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे. 50 लाखांच्या पुढे तीन व्हिव्हिआयपी आरती तर वर्षातून दोनदा लाईफटाईम व्हिआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे. तसेच सामान्य दर्शनरांगेतील सुरुवातीला आलेल्या दोन भाविकांना आरतीचा लाभ मिळणार आहे.