पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी परिसरात खाजगमी शाळेच्या बसचा भीषण अपघात झालेला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने शाळेची बस थेट ही बीआरटी लेनमध्ये घुसली आणि जोरदार धडक झाली. हा सर्व अपघात काळेवाडी फाट्याजवळ तापकीर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. बस चालक हा विद्यार्थ्यांना घरी सोडून परतत असताना हा सर्व प्रकार घडला. सुदैवाने बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,चालकाला काही आजार असल्याने अचानक फिट आली आणि त्याचे नियंत्रण सुटले आणि बस ही थेट बीआरटीला धडकली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी चालकाला तातजीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता पोलीस आणि संबंधित शाळा प्रशासनाकडून अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.