Sunday, July 13, 2025 11:14:22 AM

शालेय पोषण आहार पुन्हा होणार चविष्ट; तीन नव्या मेनूंचा समावेश

जिल्ह्यातील 4.65 लाख विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात तीन नव्या चविष्ट पदार्थांचा समावेश. पुढील चार दिवसांत अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना लाभदायक ठरण्याची शक्यता.

शालेय पोषण आहार पुन्हा होणार चविष्ट तीन नव्या मेनूंचा समावेश

School Nutrition Menu: शालेय पोषण आहार आता अधिक चवदार आणि पोषणमूल्यांनी भरलेला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील 4 लाख 65 हजार विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या आहारात आता तीन नवीन पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने याबाबत निर्णय घेतला असून, पुढील चार दिवसांत या नव्या मेनूची अंमलबजावणी होणार आहे.

याअंतर्गत, जुन्या तीन पदार्थांना निरोप देण्यात आला असून त्यांच्या जागी पौष्टिक आणि चवदार पर्याय दिले जाणार आहेत. मुलांच्या आरोग्याची व चविची काळजी घेत तयार करण्यात आलेल्या या नव्या यादीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आहाराबाबत उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांची दांडी?

दोन आठवड्यांचा सुधारित मेनू:

पहिला आठवडा:
सोमवार – व्हेज पुलाव
मंगळवार – मसाले भात
बुधवार – मटार पुलाव
गुरुवार – मूगडाळ खिचडी
शुक्रवार – चवळी खिचडी
शनिवार – चना पुलाव

दुसरा आठवडा:
सोमवार – सोयाबीन पुलाव
मंगळवार – मसुरी पुलाव
बुधवार – मूग, शेवगा वरण-भात
गुरुवार – मोड आलेली मटकी उसळ
शुक्रवार – अंडा पुलाव
शनिवार – गोड खिचडी

या नव्या यादीत सोयाबीन, मसुरी डाळ, मटकी, अंडी आणि गोड खिचडी यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व पदार्थ प्रथिनांनी भरपूर असून, मुलांच्या वाढीसाठी आवश्यक घटक देणारे आहेत. शिक्षण विभागाने हा निर्णय पोषण आहार अधिक गुणकारी आणि आकर्षक करण्यासाठी घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आहारात रस वाढेल आणि गैरहजेरीही काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


सम्बन्धित सामग्री