डोंबिवलीत भरदिवसा थरार! घरात घुसून वृद्धेच्या गळ्याला हात अन् पुढे घडलं भयंकर; VIDEO

Dombivli Viral Video : जुनी डोंबिवलीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका सोसायटीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. घराच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असून, भरवस्तीत अशा घटना घडत असल्याने परिसरातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

डोंबिवलीत भरदिवसा थरार! घरात घुसून वृद्धेच्या गळ्याला हात अन् पुढे घडलं भयंकर; VIDEO
Thief Targets Elderly Woman

जुनी डोंबिवली परिसरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेली आहे. चक्क भरदिवसा घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेली आहे. ही संपूर्ण घटना जुनी डोंबिवलीतील एका सोसायटीमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सोसायटीमध्ये राहत असलेल्या माथूर यांच्या घरी एका अज्ञात तरुणाने अचानक शिरकाव केला. त्या वेळी घरात त्यांच्या वृद्ध आई एकट्याच होत्या. संधी साधत त्या तरुणाने थेट त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन हिसकावली आणि तातडीने पळ काढला.या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. जुनी डोंबिवली परिसरात घरात घुसून चोरी तसेच चैन स्नॅचिंगचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number