नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळील ऐतिहासिक अंकाई या किल्ल्यावर आज सकाळी एक दु्र्दैवी घटना घडलेली आहे. अगस्तीमुनींच्या दर्शनासाठी आलेल्या 42 वर्षीय भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला आहे. मृत व्यक्तीचे नाव अमित धुंडगळ असे असून, ते संगमनेर येथील रहिवासी असून व्यवसायाने वकील असल्याची माहिती समोर आलेली आहे.
अचानक काळाने गाठलं
मिळालेल्या माहितीनुसार, अमित धुंडगळ हे आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत अंकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेले होते. याच दरम्यान किल्ल्यावर असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यासह असलेल्या सहकाऱ्यांनी कोणताही वेळ वाया न घालवता अंकाई गावातील काही गावकऱ्यांशी संपर्क केला.
पुढे काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच गावातील काही तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने किल्ल्यावरील संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यांनी झोळीच्या मदतीने अमित यांना किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोंगरावरुन खाली त्यांना आणत असतानाच वाटेमध्येच प्राणज्योत मालवली. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. अंकाई किल्ला हा पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असून, येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.