Jalgaon Shocker: जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात सोशल मीडियासाठी रील तयार करताना 18 वर्षीय हर्षवर्धन नन्नवरे आणि प्रशांत खैरनार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोघेही गावातील रेल्वे गेटजवळ राहायचे. अहदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या मार्गावर व्हिडिओ रील शूट करताना रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार? प्रताप सरनाईक यांनी दिले संकेत
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने हॉर्न वाजवल्यानंतरही दोघे रेल्वे रुळावरून बाजूला झाले नाही. परिणामी त्यांना रेल्वेची धडक बसली. घटनास्थळी दोन्ही तरुणांचे मोबाईल सापडले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहेत. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, दोघेही कानात हेडफोन लावून रील शूट करत होते, त्यामुळे त्यांना रेल्वेचा हॉर्न ऐकू आला नाही.
हेही वाचा - IMD Alert: पुढील 4 दिवस राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी यलो अलर्ट जारी
अपघातानंतर मृतदेह भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. नातेवाईकांच्या मते, हर्षवर्धन आणि प्रशांत यांच्यामध्ये मामा-भाच्याचे नाते होते. यापूर्वीही अनेकांनी रीलसाठी धोकादायक स्टंट करताना आपला जीव गमावले आहेत. ही घटना सोशल मीडियाच्या नादात जीव धोक्यात आणणाऱ्या तरुणाईसाठी सतर्कतेचा इशारा आहे.