एसटी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; थकीत मागण्या पूर्ण न झाल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवणार!

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला आता थेट इशारा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा; थकीत मागण्या पूर्ण न झाल्यास ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवणार!

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला आता थेट इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास 4 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मात्र, सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने निधी उपलब्ध न करून दिल्यास मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवणार असल्याचा इशारा एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

सरकारने 3 नोव्हेंबरपर्यंत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास दिवाळीच्या काळात मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून निषेध व्यक्त केला जाईल, असे श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

नेमक्या मागण्या काय?

  • एसटी कर्मचाऱ्यांची 5,740 कोटी रुपयांहून अधिक देणी थकीत असल्याचा दावा.
  • भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅच्युइटीचे सुमारे 3,350 कोटी रुपये जमा नसल्याचा आरोप.
  • सप्टेंबरच्या वेतनासाठी 1,015 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र सरकारकडून केवळ 380.06 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
  • वेतनवाढीच्या फरकापोटी मंजूर झालेले 538.83 कोटी रुपये अद्याप मिळाले नसल्याचा आरोप.

हेही वाचा - ST प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता प्रवास होणार आरामदायी; महामंडळाचा नवा प्लॅन

या प्रलंबित मागण्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील नाराजी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. निधीअभावी एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमध्येही वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात वेतन आणि इतर देणी रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद केले जात आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version