ST प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता प्रवास होणार आरामदायी; महामंडळाचा नवा प्लॅन

MSRTC Bus Service : महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लालपरीचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी महामंडळाकडून मोठी तयारी सुरू आहे. नव्या बसमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ST प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! आता प्रवास होणार आरामदायी; महामंडळाचा नवा प्लॅन
Maharashtra ST Bus Update

एसटी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांसाठी एक हक्काचे वाहन झाले आहे. कमी खर्चात आणि सोयीचा प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 200 नव्या व्होल्वो बस दाखल होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने या सर्व 200 व्होल्वो बसेस या एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बसेसमुळे प्रवाशांना प्रवासाचा अगदी आरामदायी अनुभव मिळेल. सुरुवातील कोणत्या मार्गावर या बस दाखल होतील ते समजू शकलेले नाही. मात्र, एसटीच्या या निर्णयामुळे खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर मिळणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number