Sunday, November 16, 2025 11:50:06 PM

ST Bus Reservation: दिवाळीच्या तोंडावर एसटी आरक्षण प्रणाली ठप्प! प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

दिवाळीच्या सणाच्या काळात ही प्रणाली पूर्णतः ठप्प पडल्यामुळे प्रवाशांना बस आरक्षणासाठी तडजोड करावी लागणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

st bus reservation दिवाळीच्या तोंडावर एसटी आरक्षण प्रणाली ठप्प प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

ST Bus Reservation: दिवाळीचा सण तोंडावर आला असताना एसटी महामंडळाच्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. एसटीची नवीन आरक्षण प्रणाली (ST Bus Reservation System) ठप्प पडल्याने प्रवाशांना बस प्रवासासाठी तिकीट मिळवण्यात अडचणी येत आहेत. याचा फटका फक्त प्रवाशांवरच नाही, तर कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी अक्षरशा वैतागले आहेत.

महाराष्ट्र राज्य महामंडळाने दोन वर्षांपूर्वी जुनी आरक्षण प्रणाली बदलून नवीन प्रणाली लागू केली होती. मात्र, या नव्या प्रणालीमुळे कामकाज अधिक किचकट आणि अवघड झाले आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात ही प्रणाली पूर्णतः ठप्प पडल्यामुळे प्रवाशांना बस आरक्षणासाठी तडजोड करावी लागणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Nashik Politics: अजित पवारांच्या मंत्र्याचा भाऊ भाजपात जाणार; नाशिमध्ये राजकीय घडामोडींना वेग

नवीन प्रणालीमुळे खर्चात वाढ

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आधी एका आरक्षण मेमोची प्रिंट घेताना एकच कागद लागायचा, पण आता त्याच मेमोची प्रिंट घेण्यासाठी तीन कागद लागतात. यामुळे एसटी महामंडळाचा ऑपरेशनल खर्चही वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जुन्या प्रणालीत काम करणे सोपे आणि जलद होते, पण नव्या प्रणालीत तिकीट बुकिंगची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे काम करताना त्रास होतो.

हेही वाचा - Thackeray Brothers: राज आणि उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर जोरदार फटकेबाजी, मतदार यादीतील घोळ सांगत...

कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक घोषणा

राज्य सरकारने दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी 12,000 रुपयांच्या उचलसंदर्भातील योजनाही मंजूर करण्यात आली आहे. मागील 48 आठवड्यांत 2,200 कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांसाठी देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय, दिवाळीच्या आधीच ‘आवडेल तिथे प्रवास’ पासवर 20 ते 25 टक्के दर कपात करून प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठल्याही एसटी बसने अमर्याद प्रवास करता येतो. चार किंवा सात दिवसांच्या पाससह प्रवाशांना प्रत्येक वेळेस तिकीट काढण्याची गरज नाही.
 


सम्बन्धित सामग्री