‘यंदाचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुषमा अंधारे कडाडल्या

शिवाजी पार्क, दादर येथे पार पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यंदाचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

‘यंदाचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुषमा अंधारे कडाडल्या
Sushma Andhare

आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे पार पडत आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे आणि पक्षातील इतर नेत्यांकडून एकूणच राजकीय घडामोडींवर भाष्य होण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे नेमके कार्यकर्त्यांना काय संदेश देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवाजी पार्क, दादर येथे पार पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यंदाचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

हेही वाचा- ‘मनोज जरांगेंचा 500 कोटींचा आरोप खोटा’; शिवसेना नेत्याचं प्रत्युत्तर, काय म्हणाल्या?

सुषमा अंधारे म्हणाले की, “या वेळेचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. सरकार सॅटॅलाइट पंचनामे करत आहेत. भाजप शिंदेंचे एजंट, चारा छावणीच्या नावा खाली दलाली चालू कर करतील. शिंदे फडणवीस यांची खुर्चीसाठी झुंज चालू आहे. शिंदेंची लोकसंख्या आमचे साहेब मुख्यमंत्री. आम्ही दुष्काळा सहित वेगवेगळ्या प्रश्नांवर लढत आहोत. बैलपोळ्याच्या दिवशी 48 शेतकरी आत्महत्या झाल्या. देवेंद्र फडणवीस आम्हाला काटकसरीने वागा म्हणतात. जे दरेकर गरब्यामध्ये ठुमके लावतात त्यांना सांगा.”
शिवसेनेसाठी शहीद झालो तर अभिमानच वाटेल

“615 पीएसआय बोगस पद्धतीने भरले आणि याची चौकशी होत नाही कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यावर आम्ही बोलतो तेव्हा भाजपा मला अर्बन नक्षली बोलता. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येला एक वर्षा पूर्ण झालं आत्तापर्यंत काय झालं त्याचा उत्तर द्या. प्रकाश शिंदेला का नाही बोलवलं चौकशीला. आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. 302 चा आरोप असणारी मीनाक्षी शिंदे जाहीर पत्रकार परिषद घेते आणि तुमचे पोलीस तिला सुरक्षा देतात. अगर आप हमारे नोट गिनते हो तो हमारे वोट भी गिनणे पडेंगे. टायगर श्रॉफवर बिश्नोई गॅंगने हल्ला केला. बिश्नोई गॅंग तुम्हाला वाकोल्या दाखवत आहे. लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये आहे ती जेल साबरमती गुजरात येथे आहे. शिवसेनेसाठी शहीद झालो तर अभिमानच वाटला पाहिजे.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number