टॅक्सी ऑडिट करणाऱ्या असंख्य करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. असेसमेंट ईयर 2026-27 साठी टॅक्स रिपोर्ट हा जमा करण्याची अंतिम तारीख ही जवळ आलेली आहे. आयकर विभागाने हीच मुदत वाढवून थेट 21 ऑक्टोबर 2026 केली आहे. मात्र याआधी ही डेडलाईन 30 सप्टेंबर होती. अनेक करदात्यांना वाटत होते की, चार्टर्ड अकाउंटने रिपोक्ट अपलोड केला की ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. पण असे नाही, सीएने रिपोर्ट अपलोड केल्यावर करदात्याने तो स्वत:स्वीकारणे ही बंधनकारक आहे.
कोणाला टॅक्स ऑडिट लागू होणार?
खरं तर ज्या व्यवसायाची वर्षाची उलाढाल ही 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्यांना टॅक्स ऑडिट हे लागू होते. रोख व्यवहार पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ही मर्यादा थेट 10 कोटी रुपयांपर्यंत वाढली जाते. व्यावसायिकांसाठी ही मर्यादा 50 लाख रुपये आहे.
हेही वाचा – रेल्वेचा कडक नियम! आता कानाला हेडफोन नाही तर खिशाला भुर्दंड; नेमका निर्णय काय जाणून घ्या
रिपोर्ट अपलोडपूर्वी काय तपासावे?
महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या आर्थिक नोंदी या पूर्ण करुन घ्याव्यात. उलाढाल ही GST रिटर्न, विक्री बिले तसेच बँक स्टेटमेंटशी जुळवून घ्याव्यात. तर घसारा (Depreciation), TDS, TCS, तसेच MSME पेमेंटसंबंधी माहिती ही तपासून घ्यावी. लागू असल्यास FORM 3CA/3CB सोबत Form 3CD देखील दाखल केला जातो.
Accept कसे करावे?
ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करुन पहिल्यांदा वर्कलीस्टमधील ”Pending for Acceptance ” या पर्यायावर जा. त्यानंतर रिपोर्ट तपासून Accept करा. या करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची तारीख ही 21 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live