एका क्षणात तीन कुटुंबांचा आनंद हिरावला! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed Accident News : बीड जिल्ह्यातील केज ते मांजरसुंबा या मार्गावर अंबळाचे बरड परिसरात टिप्पर आणि पिकअपची भीषण धड क झाली. या घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले असून पिकअपमधील असलेल्या चारही जनावरांचाही मृत्यू झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे
बीडमध्ये भीषण अपघात
Major Road Accident in beed

बीड जिल्ह्यातील केज ते मांजरसुंबा या महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबळाचे बरड परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने समोरुन येणाऱ्या पिकपला जोरदार धडक दिली. याच अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले असून पिकपमध्ये असलेली चारही जनावरेही या अपघातात ठार झाली आहेत.

वळणावर काळ आडवा आला
मिळालेल्या माहितीनुसार, पिकपमधून जनावरांची वाहतूक सुरु होती. दरम्यान अंबळाचे बरड येथील वळणावर टिप्पर चालकाचे अचानकनियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला.

हेही वाचा-आई-वडिलांच्या समोर पोटच्या लेकीचा अंत; तर पालकांची प्रकृती चिंताजनक; नेमकं घडलं काय?

या अपघातामध्ये पिकपमधील हनीफ कुरेशी, आरिफ कुरेशी यांच्यासह एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.  अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांपैकी एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version