Women on Moving SUV Sunroof: गोरेगावमधील ओबेरॉय मॉलजवळ एका SUVच्या सनरूफवर बसलेल्या दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या फुटेजमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये SUV चालवताना महिलांना सरळ सनरूफवर बसून राईडचा आनंद घेताना दिसल्या.
रस्ते सुरक्षेवर गंभीर चिंता
व्हिडिओमध्ये जवळपास अनेक दुचाकीस्वारही दिसून येत आहेत, ज्यात काही हेल्मेट न घातल्याचे स्पष्ट आहे. यामुळे वाहतूक नियमांचे अनेक उल्लंघन एकाच फ्रेममध्ये अधोरेखित झाले आहे. नेटिझन्सनी या कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वापरकर्त्याने लिहिले, 'ते काय विचार करत होते?', तर दुसऱ्याने टिप्पणी केली, 'हे आधुनिक लोक इतके लाजिरवाणे आहेत आणि त्यांना ते कळतही नाही.'
हेही वाचा - Balasaheb Thorat on Fake Voter List: राज्यातील मतदारयादीत गोंधळ; राज ठाकरें पाठोपाठ बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा
अनेकांनी वाहनाचा शोध घेऊन संबंधितांना दंड करण्याची मागणी केली. वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, SUVच्या सनरूफवर बसणे मोटार वाहन कायदा, 1988 च्या तरतुदींचे उल्लंघन करते. तसेच कलम 184 जनतेसाठी धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे दंडनीय ठरवते, तर कलम 177 पोलिसांना चालत्या वाहनातून डोके किंवा शरीर बाहेर काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची परवानगी देते.
हेही वाचा - Raj Thackeray: 'राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले', राज ठाकरेंचा गंभीर आरोप
या घटनेमुळे मुंबईत रस्ते सुरक्षा आणि निष्काळजी वाहनचालकांवर नियंत्रण या विषयावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. शहरात अशा प्रकारच्या धोकादायक वर्तनाला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिक आणि पोलीस प्रशासन दोघांनाही सजग राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.