मुंबई: मुंबई शहरातील 'ए', 'बी' आणि 'ई' झोनमधील काही भागांचा पाणीपुरवठा बुधवार, 28 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार, 29 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी बंद राहील. तसेच, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने 'ई' सेक्टरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन कामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत, नवानगर, डॉकयार्ड मार्गावरील जुनी 1200 मिमी व्यासाची पाण्याची पाईपलाईन बंद केली जाईल आणि 1200 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाईल.
हेही वाचा: संभाजीनगरात दरवर्षी 6 ते 7 महिलांचा हुंडाबळी तर दीड हजारांच्यापेक्षा जास्त महिलांचा छळ
तसेच, भंडारवाडा जलाशयाच्या कप्पा-1 वरील जुने 900 मिमी व्यासाचे स्लूस गेट काढून टाकले जाईल आणि नवीन 900 मिमी व्यासाचे स्लूस गेट बसवले जाईल. ही दोन्ही कामे 28 मे 2025 रोजी सकाळी 10:00 ते 29 मे 2025 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत पूर्ण केली जातील. या काळात 'ए', 'बी' आणि 'ई' विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर काही भागात अंशतः बंद राहील, असे महापालिकेने म्हटले आहे.
हेही वाचा: डिनो मोरयाची चौकशी करा... आदित्य ठाकरेंचं पितळ उघडं पडेल; मंत्री नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
यादरम्यान, संबंधित भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्याच्या आदल्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असताना पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाण्याच्या मुख्य कामानंतर पुढील दोन दिवस संबंधित भागात कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी फिल्टर करून उकळून प्यावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित