पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. हगवणे कुटुंबातील सुनांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही. तसेच वैष्णवीच्या बाळासंदर्भातही पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. हयगय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हगवणे कुटुंबाला वाचवण्याचा पुणे पोलिसांनी केला प्रयत्न?
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही. वैष्णवीच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनाच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय.
हेही वाचा : लातुर महापालिकेचा दवाखाना चक्क ग्रामपंचायत हद्दीत; स्वराज्य पक्षाकडून कारवाईची मागणी
वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ 1 मिनिटं 10 सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्याच्या बाळाची सहा दिवस आबाळ झाली.
पुणे पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना कुठे-कुठे फ्री हँड दिला?
फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता पण त्याला अटक करण्यात आली नाही. 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात गेले. आमची हद्द नाही, असं सांगत पीआय विश्वजीत कायंगडे यांनी तक्रार घेतली नाही. बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभुते यांनीही कस्पटे कुटुंबीयांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाणविरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदला नाही.
हेही वाचा : निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी
वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणते पोलीस अधिकारी रडारवर?
1. पीआय विश्वजीत कायंगडे
2. पीआय विजय विभुते
3. पीआय संतोष गिरी गोसावी
4. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
5. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
6. IG जालिंदर सुपेकर