Buldhana Accident : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! विद्युत वाहिनीचा प्रवाह सुरू असताना काम, कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; संतप्त नातेवाईकांचे आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात कोलोरी सबस्टेशनवर हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीवर काम करत एका खाजगी विद्युत कर्मचाऱ्यांचा विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Buldhana Accident : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! विद्युत वाहिनीचा प्रवाह सुरू असताना काम, कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; संतप्त नातेवाईकांचे आंदोलन
Buldhana Accident

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात कोलोरी सबस्टेशनवर हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीवर काम करत एका खाजगी विद्युत कर्मचाऱ्यांचा विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हाय व्होल्टेज विद्युत वाहिनीवर काम करत असताना हा अपघात घडला.  अशोका बिडकॉन या खाजगी कंपनीसाठी मजुरीवर काम करणाऱ्या जनार्दन हिवराळे यांना कुठलेच सुरक्षा साहित्य देण्यात आले नव्हते.

हेही वाचा- Ganesh Visarjan : हृदयद्रावक! गणपती विसर्जन करून मंडपात झोपले अन् काळाने गाठलं, 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी; घडलं काय?

शिवाय महावितरणच्या कर्मचाऱ्याने दुसरीच विद्युत वाहिनी बंद केल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यामुळे मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि महावितरण मध्ये शासकीय नोकरी देण्याच्या मागणीसाठी मृतदेह घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी कोलोरी सब स्टेशन वर ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. अपघातासाठी कारणीभूत असणाऱ्या अशोका बिडकॉन कंपनी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर आता काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number