अक्षता पडण्याआधीच लग्नमंडपात थरार! प्रेमविवाहावरून पेट्रोल टाकून….;महाराष्ट्र हादरला

Wedding Shocking Incident : नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एका लग्नसमारंभादरम्यान प्रेमविवाहाच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर गंभीर आरोप करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

अक्षता पडण्याआधीच लग्नमंडपात थरार! प्रेमविवाहावरून पेट्रोल टाकून….;महाराष्ट्र हादरला
Crime News

येवला : नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेलं जोडप, काही तासांत मांडवात पडणाऱ्या अक्षता आणि या खास क्षणासाठी एकत्र जमलेले नातेवाईक. मात्र, या आनंदाच्या क्षणाला गालबोट लागेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. येवला शहरातील आसरा लॉन्स येथे प्रेमविवाहाच्या कारणावरुन अचानक वाद निर्माण झाला. त्यानंतर जे झालं अत्यंत धक्कादायक होतं.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील नैताळे परिसरातील वधू आणि येवला येथील नवरदेव यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर हिंदू संस्कृतीनुसार विवाहविधी पार पाडण्यासाठी येवला शहरातील आसरा लॉन्स येथे लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता.
मात्र, वधूकडील काही नातेवाईक तेथे आल्याने वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- पुतण्याचा रक्तरंजित थरार! विहिरीच्या पाण्यावरून काका-काकूला संपवलं, हिंगोली हादरलं!

पेट्रोल टाकल्याचा आरोप
दरम्यान, वधूकडील नातेवाईकांनी नवरदेवाच्या बाजूच्या मंडळींना मारहाण केली तसेच पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number