दुर्दैवी! 32 वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; काठावरील रेती उत्खननाच्या खड्ड्यामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहोगाव देवी परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
bhandara district
bhandara district

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहोगाव देवी परिसरात नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 32 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आबिद सत्तार शेख, रा. शास्त्री वॉर्ड, वरठी असे मृत तरुणाचे नाव आहे. आबिद शेख हा आपल्या दोन मित्रांसोबत मोहोगाव देवी परिसरातील नदीकाठी गेला होता. तिघांनी जेवण केल्यानंतर आबिद नदीत आंघोळीसाठी उतरला. मात्र, नदीकाठावर रेती उत्खननामुळे तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यात त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. आबिद बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अखेर नदीत शोध घेतल्यानंतर आबिद शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा : येवल्यात ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक, ट्रकसह ओमनी कारही फरफटत गेली; अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version