Saturday, July 20, 2024 11:38:36 AM

veteran-actress-asha-kale-honored-with-lifetime-achievement-award
ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानने गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा काळे यांनि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं ज्येष्ठ अभिनेत्री अशा काळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान मानले जाते. या वर्षी बालगंधर्व मंदिराचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा आहे. हा सोहळा २६ जून रोजी पार पडणार असून यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यानंतर पुढील तीन दिवस २८ जून पर्यत विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे.


सम्बन्धित सामग्री