Thursday, July 18, 2024 09:57:20 PM

famous-singer-is-in-love-with-actress
सुप्रसिद्ध गायक 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात ?

सुप्रसिद्ध गायक या अभिनेत्रीच्या प्रेमात
मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी प्रमाणेच तिच्या मुलींचेही बरेच चाहते आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर तर स्टेट चर्चेत असते. दरम्यान आता जान्हवीची बहीण खुशी कपूर ही सध्या तिच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणामुळे चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे खुशी कपूरचं नाव हे गायक एपी ढिल्लोंसोबत जोडले जात आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)

गायक एपी ढिल्लों हा एक नावाजलेला गायक आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. प्रेक्षकांना नेहमीच त्याची वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. आता एपी ढिल्लोंचा एक नवीन गाणं आलं असून त्याचं नाव 'ट्रू स्टोरीज' असे आहे. या गाण्यात एपी ढिल्लों नं खुशी कपूरचं नाव घेतलं आहे. यात तो म्हणतो" 'जदों हस्से ता लागे तू खुशी कपूर" अर्थात जेव्हा तू हसतेस तेव्हा तू खूशी कपूरसारखी दिसतेस. एपी ढिल्लोंने त्याच्या गाण्यात खुशी कपूरचं नाव घेतल्यानं त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे ख़ुशी कपूर आणि एपी ढिल्लों एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सम्बन्धित सामग्री