महाराष्ट्र: महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात प्रसिद्ध आणि आवडती योजना ठरली. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यात महायुतीला भरभरून मते मिळाली आणि महायुतीची बहुमताची सत्ता आली, अशी कबुली महायुतीच्याच नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे दिली आहे. मात्र, आता महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेच्या निकषात बदल करून त्याची पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणीत अनेक महिला अपात्र ठरणार आहेत. यात आता बुरखा पांघरलेल्या 4 भावांनी 'लाडकी बहीण' योजनेतून माघार घेतलीय.
हेही वाचा: ठाकरेंचे आमदार शिंदेच्या संपर्कात?
बुरखा पांघरलेल्या भावांची माघार?
सरकारची अति महत्त्वपूर्ण असलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे, हिंगोलीत 16 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र ठरले असून, आठ महिलांनी माघार घेतली आहे, मात्र माघार घेतलेल्या अर्जा मध्ये बहिणीचा बुरखा पांगरलेल्या लाडक्या भावाने देखील कारवाईच्या बडग्याने माघार घेतल्याचे पुढे आले आहे. या चार जणांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
दरम्यान बुरखा पांघरलेल्या 4 भावांनी 'लाडकी बहीण' योजनेतून माघार घेतली असून 8 महिलांमध्ये चक्क 4 पुरुषांचा समावेश या योजनेत असल्याचं दिसून येतंय. बुरखा घालून फोटो काढत महिला म्हणून अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडालीय. दरम्यान आता खोटे अर्ज दाखल करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणारे.