Monday, February 17, 2025 01:58:16 PM

Ahmednagar Renaming Court Notice
अहमदनगर नामांतराचा मुद्दा खंडपीठात; केंद्र आणि राज्य सरकारसह आयुक्तांना नोटिसा

औरंगाबाद खंडपीठाची सुनावणी; चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश

अहमदनगर नामांतराचा मुद्दा खंडपीठात केंद्र आणि राज्य सरकारसह आयुक्तांना नोटिसा

अहिल्यानगर नामांतर प्रकरण उच्च न्यायालयात; केंद्र व राज्य सरकारला नोटीस
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय बेकायदेशीर? याचिकाकर्त्यांची न्यायालयात धाव

अहिल्यानगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अहिल्यानगर (अहमदनगर) शहराच्या नामांतराच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, डॉ. पुष्कर सोहनी आणि आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी दाखल केली आहे. या याचिकेनुसार, नामांतराचा प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

👉👉 हे देखील वाचा : गुप्ता यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता

ही याचिका प्रलंबित असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारचा ठराव मंजूर केल्यामुळे याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज सादर करत नामांतराचा ठराव बेकायदेशीर ठरवून तो रद्द करण्याची मागणी केली. काल झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाने केंद्र तसेच राज्य सरकारसह नाशिक विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना नोटिसा बजावल्या असून चार आठवड्यांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

महापालिका अस्तित्वात नसताना आणि लोकांकडून हरकती मागविल्या नसताना, हा निर्णय घेतला गेला आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चुकीचा ठरतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयात धाव घेतली असून पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी दिली.

👉👉 हे देखील वाचा : अटल सेतूला प्रवाशांचा प्रतिसाद नाही?


 

 

 


सम्बन्धित सामग्री