Aurangzeb Tomb Row: मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा देशभर चर्चेचा विषय बनला आहे. आता औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. केतन तिरोडकर नावाच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत औरंगजेबाची कबर पाडण्याची आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कायदा, 1958 च्या कलम 3 शी सुसंगत नाही, असंही या जनहित याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये असंतोष -
खरं तर, अलिकडेच छावा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील हिंसक संघर्ष दाखवण्यात आला. या चित्रपटाद्वारे लोकांना समजले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे नखे काढले आणि त्यांचे डोळे उपटून टाकले. औरंगजेबाचे यावरही समाधान झाले नाही आणि त्याने संभाजी महाराजांची जीभ कापून टाकली. इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी औरंगजेबाने संभाजी महाराजांना मरण यात्ना दिल्या. परंतु, धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी मृत्यूला जवळ केले. मात्र, धर्माला ठेचं पोहोचू दिली नाही.
हेही वाचा - नागपुरातल्या दंगलीत बांगलादेशाचा हात ?
औरंगजेबाने संभाजी महाराजांना किती क्रूर वागणूक दिली होती, हे छावा चित्रपटातून लोकांना समजलं. चाळीस दिवस संभाजी महाराजांना मरण यात्ना दिल्यानंतर शेवटी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा शिरच्छेद केला होता आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून तुळापूर येथे नदीत फेकून दिले.
औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी -
दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या विधानामुळे या प्रकरणाला वेग आला. 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी औरंगजेबाचे वर्णन एक चांगला राजा असे केले होते. तथापि, नंतर दबाव वाढल्याने त्यांनी आपले विधान मागे घेतले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, असे म्हटले होते. हे काम कायद्याच्या कक्षेत राहूनच केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा - धाराशिवमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा येथील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनीही या प्रकरणात उडी घेतली आणि जर ही कबर हटवली नाही तर ते निषेध करतील, असा इशाराही देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार घडवून आणण्यात आला.