सुवर्णसंधी! नवरात्रीत सोने-चांदीच्या दराला अखेर ब्रेक; जाणून घ्या आजचे ताजे दर

नवरात्रोत्सवात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
सुवर्णसंधी! नवरात्रीत सोने-चांदीच्या दराला अखेर ब्रेक; जाणून घ्या आजचे ताजे दर

नवरात्रोत्सवात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचव्या माळे दिवशी सराफा बाजारातून चांगली बातमी आली आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार 24, 22 आणि 18 कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर घसरले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.गुड रिटर्न्सच्या रिपोर्टनुसार, सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर
गुंतवणुकीचा किंग असलेल्या 24 कॅरेट सोन्याने आज ग्राहकांना मोठा दिलासा दिला. एक तोळा मागे थेट 820 रुपयांची घसरण झाली असून आता 1 तोळ्यासाठी 1,47,480 रुपयेच मोजावे लागणार आहेत. 10 तोळ्याचा विचार करत असाल तर तब्बल 8,200 रुपयांची बचत होणार आहे, नवीन दर आहे 14,74,800 रुपये.

हेही वाचा – मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचा 6 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, प्रमुख मागण्या काय?

22 कॅरेट सोन्याचे दर
दागिन्यांची शान असलेल्या 22 कॅरेट सोन्यानेही मन जिंकलं. 1 तोळ्यामागे 750 रुपयांनी दर उतरले असून दागिने आता 1,35,150 रुपयांत मिळतील. 10 तोळ्यासाठी 7,500 रुपयांची सूट मिळून दर 13,51,500 रुपयांवर आला आहे. नवरात्रात नवीन दागिने करण्याची हीच खरी वेळ!

18 कॅरेट सोन्याचे दर
याबरोबरच 18 कॅरेट सोनेही स्वस्त झाले. 1 तोळ्यामागे 660 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 1,10,590 रुपये झाला आहे. तर 10 तोळ्यासाठी 6,100 रुपयांची बचत होऊन तुम्हाला 11,05,100 रुपयांत सोने मिळेल.

चांदीची चमकही वाढली
सोन्यासोबत चांदीनेही चमक दाखवली. 1 ग्रॅम चांदी 5 रुपयांनी स्वस्त होऊन 230 रुपयांना मिळत आहे, तर 1 किलो चांदी खरेदीवर थेट 5,000 रुपयांची घसरण झाली असून आजचा दर 2,30,000 रुपये आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version