मुंबई, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील प्रामुख्याने उत्तर, वायव्य व मध्य भागात ३० लाख ग्राहकांकडून बुधवारी विक्रमी २,१२७ मेगावॉट विजेची कमाल मागणी नोंदवण्यात आली. अदानी इलेक्ट्रिसिटीचे हे ग्राहक होते. दरम्यान मुंबईची कमाल वीज मागणी त्यावेळी ४,०४१ मेगावॉट इतकी होती. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ३० लाखांहून अधिक ग्राहकांनी याआधी ३१ मे २०२३ रोजी विक्रमी २,०८२ मेगावॉट विजेची कमाल मागणी नोंदवली होती. तो विक्रम २,१२७ मेगावॉटसह मोडित निघाला आहे.