Saturday, January 18, 2025 07:08:46 AM

बोईसर रेल्वे फाटक आठवडाभर बंद

बोईसर रेल्वे फाटक आठवडाभर बंद

बोईसर , २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बोईसर, वंजारवाडा येथील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पूर्व भागातील वाहनचालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आहे. बोईसर वंजारवाडा येथील फाटक ११ ते २२ एप्रिलदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता, मात्र या सुमारास विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने फाटक बंदीचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता २ मेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे फाटक बंद ठेवण्याचा सुधारित निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आठवडाभर फाटक बंद राहणार असल्याने बोईसरच्या पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. फाटकाजवळील रेल्वे रुळांची अति आवश्यक दुरुस्ती, उखडलेले पेव्हरब्लॉक पुन्हा व्यवस्थित बसविणे आणि अन्य दुरुस्तीच्या कामांसाठी हे फाटक पश्चिम रेल्वेतर्फे बंद ठेवले जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री